तेजज्ञान फाउंडेशनचा रौप्य महोत्सवा निमित्त ध्यान शिबिराचे शिरूर येथे रविवारी मोफत आयोजन
शिरूर ता. 29: तेजज्ञान फाउंडेशनतर्फे रौप्यमहोत्सवी ध्यान महोत्सवाचे शिरूर येथे निःशुल्क आयोजन रविवारी (दि.१) करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शिरूर नगर परिषद मंगल कार्यालयात दुपारी 4:30 ते 7:00 पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. तरी शिरूर तालुका व शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक नितीन कावरे यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे रविंद्र धनक व आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरूजी उपस्थित राहणार आहेत.
येथे तेज ज्ञान फाउंडेशन 2009 पासून कार्यरत आहे तसेच संतोष गाडेकर यांनी विज्ञान सेंटरसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे.
तेजज्ञान फाउंडेशन सेवाभावी संस्था असून गेली २५ वर्षे ध्यानाच्या माध्यमातून समाजात सकारात्मकतेची बीजे पेरण्याचे काम करीत आहे. या महोत्सवात त्यांचे हजारो शिष्य सहभागी होणार आहेत.कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून शिरूरवासियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
